वृद्धांचे दैनंदिन जीवन
वृद्धांच्या वयाचा विचार करता त्यांच्या राहण्याची उठबसण्याची, चालाफिरण्याची वेगळी स्वतंत्र अवस्था करणे कित्येकदा आवश्यक होते. प्रकृती धकधाकट असेल तर राहण्याच्या समस्या निर्माण होत नाही काही अपवाद वगळता बहुतेक वृद्ध कुटुंबातच, आपल्या मुला मुलींसोबत उरलेले आयुष्य घालवतात.
वृद्धांना अंधारामध्ये नीट दिसत नाही त्यामुळे कमी उजेडाच्या जागी येता जाताना अडखळण्याची, पडण्याची भीती वाटत असते यासाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था आवश्यक असते. ज्या फरशीवरून ते येजा करतात, ती जर अतिशय गुळगुळीत असेल तर त्यावरून चालताना घसरण्याची शक्यता असते. विशेषतः न्हाणीघरामधील फरशा ओलाव्यामुळे साबणाच्या पाण्यामुळे निसर्डे होण्याची शक्यता असते न्हाणीघरात पाय घसरून पडण्याची बरीच उदाहरणे सापडतात असे घसरत असताना डोके जर नळावर आपटले तर गंभीर इजा होण्याची शक्यता असते तसेच या वयात हाडे ठिसूळ झाल्यामुळे पडल्यानंतर अस्थिभंगाची शक्यता दाट असते आणि या वयात हाडे पूर्वीसारखी सांधत नाही.
बऱ्याचश्या वृद्धांच्या बाबतीत विसराळूपणा आढळतो आपण आपल्या वस्तू चष्मा हात रुमाल काठी नेमकी कुठे ठेवली हे त्यांना नीट आठवत नाही यासाठी त्या वस्तू ठराविक जागी असतील व दिसतील अशी काही व्यवस्था करणे योग्य असते. वृद्धांच्या खोलीमध्ये हवा खेळती मोकळी असावी उन्हाचा थंडीचा त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करणे चांगले थोडक्यात वयस्कर व्यक्तींची त्यांची शारीरिक मानसिक स्थिती यांचा विचार करून जर त्यांच्या राहण्याची व्यवस्था शक्य तितक्या अनुकूल केल्यास भविष्यातील धोके टाळणे शक्य आहे आजकाल कुटुंब छोटी झाल्यामुळे जागेच्या अभावामुळे बऱ्याच अडचणी वृद्धांना भेडसावत असतात जे वृद्ध आपल्या मुलांबरोबर राहत नाहीत त्यासाठी वृद्धाश्रमासारख्या संस्था आपल्याही देशात वाढत चाललेल्या आहेत आणि त्या ठिकाणी वृद्धांच्या शारीरिकलचा पूर्ण होऊ शकतील अशी व्यवस्था होऊ शकते आर्थिक दृष्ट्या झेपत असेल तर अनेक वृद्धाश्रमात उच्च दर्जाच्या सोयी वर्तमानपत्रे टीव्ही जॉगिंग पार्क क्लब अशा व्यवस्था केल्या जाऊ शकतात.
#stress #anxiety #rehabcentrefordrugaddicts #rehabcentreforalcoholaddicts #rehabilitationcentremumbai #deaddictioncentremumbai #nashmuktikendramumbai #rehabcentre #deaddictioncentre #psychiatriccentre #psychiatrichospital
For More Information, Please Call on – 9082897659.
Comments