top of page
Search

Stress

  • Writer: Roshni Rehab Centre
    Roshni Rehab Centre
  • Nov 22, 2022
  • 2 min read

ताणतणाव अर्थात स्ट्रेस पण स्ट्रेस म्हणजे नक्की काय आपण बऱयाचदा सहज म्हणतो कि मला स्ट्रेस आलाय तर ताण-तणाव या शब्दाचा अर्थ तीन प्रकारे लावला जातो काही शास्त्रज्ञाने ताण-तणाव याचा अर्थ असा लावला आहे. भूकंप, चक्रीवादळ, आग, विवाह बाळाचा जन्म, दंगलग्रस्त भागात वास्तव्य इत्यादी परिस्थितीमुळे उद्दीपकामुळे ताण-तणाव निर्माण होतो.


व्यक्तीला दिलेल्या प्रतिक्रियेला ताण-तणाव असे म्हणतात एखाद्या व्यक्तीला जुळी मुले झाली आणि जर त्या व्यक्तीला आर्थिक चिंता भेडसाव लागली किंवा तिची झोप उडाली तरच तिची प्रतिक्रिया ताण-तणावाची आहे आणि जर तीच प्रतिक्रिया फारशी त्रासाची नसेल तर तिला ताण-तणाव नाही असे म्हणतात.


व्यक्ती आणि तिची परिस्थिती यांच्यातील अंतरक्रियेच्या प्रक्रियेला ताण-तणाव असे म्हटले आहे .

व्यक्तीची सक्षमता, परिस्थितीतील पूर्वकथनीयता, ताणकारक प्रसंगाचा वेग अशा सर्व घटकांवर एखाद्या व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीत ताण-तणाव जाणवेल की नाही हे ठरत असते. तसेच त्या व्यक्तीला ताण-तणाव वर अनुभवास येईल की नाही हे त्या व्यक्तीच्या बोधात्मक असंवेदनावर अवलंबून असते.


एखादा प्रसंग घडल्यावर त्या प्रसंगाचे संवेदन व्यक्तीला कसे होते म्हणजेच त्या प्रसंगाचा ती व्यक्ती अर्थ कसा लावते त्याच्याशी दोन हात करण्यासाठी स्वतःकडे कोणती कोणती साधने आहेत याबद्दल व्यक्ति काय विचार करते यावर तिला ताण-टणाव जाणवेल की नाही हे ह्याच्यावर अवलंबून असते.


एखाद्या प्रसंगापासून आपल्याला धोका किंवा भीती आहे असे संवेदन झाल्यास त्या प्रसंगाचा ताणतणाव व्यक्तीला जाणू लागतो. जे प्रसंग नकारात्मक गुण कमी मिळणे,नापास होणे असे असतात ते अनियंत्रित असतात जे पूर्व कथनीय नसतात ते प्रसंग जास्त तणावपूर्वक समजले जातात.


ताण निर्माण करणाऱ्या परिस्थितीचे म्हणजेच स्थानकाचे (स्ट्रेसर) संवेदन करताना दोन स्थिती (फेजस) निर्माण होतात

1)प्राथमिक असंवेदन

2)द्वितीय असंवेदन


प्राथमिक असंवेदनमध्ये व्यक्ती असा विचार करते की हा प्रसंग आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे का आणि तो धोकादायक व नुकसानकारक आहे का? या प्रसंगाचा आपल्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल का? द्वितीय पातळीवर निर्माण होणारा धोका व नुकसान याची भरपाई करण्यासाठी केल्या जाणाऱ्या आसंवेदना तिच्याकडे पुरेशा क्षमता आणि साधन आहेत का असा विचार केला जातो. शास्त्रज्ञानाच्या मते ही दोन्ही आसंवेदन व मूल्यमापन झाल्यानंतर व्यक्तीला त्या प्रसंगांना प्रतिक्रिया सुरू होतात. या प्रतिक्रियांमध्ये शरीरांतर्गत बदल, भावनिक बदल, बोधात्मक बदल आणि वर्तनात्मक बदलांचा समावेश होतो. अशा रीतीने आज संवेदन विषयी सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञानाच्या मते माणसे प्रथम विचार करतात. प्रसंगाचा अर्थ लावतात आणि नंतरच प्रसंगाला प्रतिक्रिया देतात.


उदाहरणार्थ रिकाम्या आणि चांगल्या रस्त्यावर गाडी चालवणे हे व्यस्त आणि खडबडीत रस्त्यावर गाडी चालवण्यापेक्षा नक्कीच कमी ताणकारक वाटते त्यामुळे आपल्या समोरची परिस्थिती येते तिचा आपण आधी अर्थ लावतो आणि नंतरच त्या परिस्थितीला प्रतिक्रिया देतो. अशा रीतीने आपल्या विचारांचा, बोधात्मक असवेदनाचा परिणाम आपण एखाद्या प्रसंगातील ताणाची तीव्रता किती आहे हे ठरवण्यावर होतो आणि याच कमी व जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.



For More Information, Please Call on – 90828 97659.


https://www.facebook.com/roshnirehabcentre/

https://www.instagram.com/roshnirehabilitationcentre1/

https://www.roshnirehabilitationcentre.com/

https://twitter.com/roshni_centre/



 
 
 

Comments


bottom of page