top of page
Search

Substance Dependence

Writer's picture: Roshni Rehab CentreRoshni Rehab Centre

मादक द्रव्यावलंबन

मादक पदार्थ अवलंबन हा मादक पदार्थांच्या वापराशी संबंधित असमायोजक प्रकार स्पष्ट केला आहे. या विकृतीच्या व्यक्तीला ज्याचे व्यसन आहे त्या विशिष्ट औषधांसाठी शारीरिक श्रुधा (Craving) निर्माण होते.


मादक द्रव्यावलंबन प्रकाराचे निकष

(खालील पैकी तीन किंवा जास्त निकष जर बारा महिन्यांच्या कालावधीत दिसून आले तर मादक द्रव्य अवलंबन विकृती आहे असे मानले जाते )


1. सहिष्णुता (Tolerance)

अपेक्षित परिणाम साधण्यासाठी विशिष्ट पदार्थ जास्त प्रमाणात सातत्याने घेण्याची गरज वाढणे. तो सातत्याने त्याच प्रमाणात घेतल्यामुळे हळूहळू त्याचे परिणाम नाहीसे होऊ लागणे.


2. अपवेशन (Withdrawal)

वैशिष्ट्यपूर्ण अपवेशन लक्षणपुंजानुसार (Characteristic Withdrawal Syndrome) एखादा मादक पदार्थाचा वापर अपवेशन लक्षण दूर करण्यासाठी किंवा ती लक्षणे टाळण्यासाठी केला जाणे.


3. मादक पदार्थ जास्त प्रमाणात आणि बराच काळ घेत राहणे.


4. मादक पदार्थसेवन सोडून देण्याचे प्रयत्न अयशस्वी होणे किंवा त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात अपयश येणे.


5. मादक पदार्थ मिळवण्यामध्ये बराच वेळ घालवणे, त्याचा वापर करणे, त्याच्या परिणामातून सावरणे.


6. व्यसनामुळे महत्त्वाची सामाजिक, व्यावसायिक कर्तव्य आणि करमणुकीचे कार्य कमी होणे, त्यांच्याशी संबंधित गोष्टीवर परिणाम होणे.


7. मादक द्रव्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे शारीरिक, मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत हे कळत असूनही त्या पदार्थांचे सेवन सातत्याने करणे.



For More Information, Please Call on – 9082897659.





98 views0 comments

Comments


bottom of page