झोपेसाठीची पथ्यं
- Roshni Rehab Centre
- Mar 17, 2022
- 1 min read
Updated: Nov 21, 2022
झोप सुरळीत होण्यासाठी काही पथ्यं पाळलीत तर उत्तम. या पथ्यांना स्लीप हायजीन म्हटलं जातं.
* सकाळी जागं होण्याची वेळ निश्चित करावी आणि त्या वेळीच उठावं. त्या वेळी कितीही झोपावंसं वाटत असेल तरीही अंथरुणात पडून राहू नये.
* दिवसा झोप घेणं शक्यतो टाळावं.
* संध्याकाळनंतर चहा, कॉफी, चॉकलेट, कोको बिस्कीट इत्यादी पेय व पदार्थ खाणं, पिणं टाळावं. तंबाखू, मिश्री, सिगारेट व तत्सम उत्तेजक पदार्थाचं सेवन तात्काळ थांबवावं. मद्यप्राशनाने झोपेचा क्रम बदलून निद्रानाशाचा त्रास संभवतो.
* रात्रीच्या जेवणात तिखट, तेलकट, तळलेले पदार्थ टाळावेत. शक्यतो नैसर्गिक आहार घ्यावा.
* पलंग किंवा अंथरुण केवळ झोपेसाठीच वापरावं. झोप येत नसेल तर आडवे पडून विचार करत बसू नये किंवा जबरदस्तीने झोप आणण्याचा प्रयत्न करू नये. त्या वेळी झोपेची जागा सोडून घरात हॉलमध्ये खुर्चीवर बसावं. झोप येत आहे असं वाटल्यास पलंगावर झोपण्यास जावं.
* पलंग किंवा झोपेची जागा वाचन करण्यासाठी, मोबाइल पाहण्यासाठी वापरू नये.
* झोपायच्या खोलीत कमीत कमी प्रकाश आणि कमीत कमी आवाज असावा.
* योगाचे प्रशिक्षकांकडून घेतलेले प्रशिक्षणदेखील झोपेसाठी उपयोगी ठरते. (वाचून केलेला योगा योग्य नाही.)
स्लीप हायजीनची पथ्यं पाळल्यास झोपेच्या तक्रारी कमी होतात. आपल्या शरीराला त्या प्रकारे प्रशिक्षण मिळाल्यावर अंथरुणात पडल्यापडल्या उत्तम झोपेचा (क्वालिटी स्लीप) आनंद घेता येतो
#Stress #Anxiety #RehabCentreforDrugAddicts #RehabCentreforAlcoholAddicts #RehabilitationCentreMumbai #DeaddictionCentreMumbai #NashMuktiKendraMumbai #StayHomeStaySafe #RehabCentre #DeAddictionCentre #PsychiatricCentre
For More Information, Please Call on – 90828 97659.
https://www.roshnirehabilitationcentre.com/

Comments